Sim Card बाबत दूरसंचार विभागाकडून नवीन नियम देशात लागू झाला आहे. एकाच्याच नावावर 9 पेक्षा जास्त सिम कार्ड असणाऱ्यांना सिम व्हेरिफिकेशन करावे लागणार
Sim Card Rule : DOT (Department Of Telecommunication) कडून मोबाईल सिम कार्ड (Mobile Sim Card) बाबत नवीन नियम लागू करण्यात आला आहे. मोबाईल फोन वापरणाऱ्यांची संख्या देशात जास्त आहे. अनेकजण स्वतःच्या नावावर एकापेक्षा जास्त सिम कार्ड (Sim Card) घेतात. एकापेक्षा जास्त सिम कार्ड (Sim Card) घेणाऱ्यांबाबत दूरसंचार विभाग (DoT) कडून एक नवीन नियम जारी करण्यात आला आहे. आता एकाच्याच नावावर जास्त सिम कार्ड (Sim Card) घेण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे.
दूरसंचार विभागाकडून (Department Of Telecommunication) नवीन नियमानुसार, 9 पेक्षा जास्त सिम ठेवणाऱ्या यूजरला सिम कार्डचे व्हेरिफिफिकेशन (SIM Card Verification) करणे बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे सिम कार्ड डिॲक्टिवेट (SIM Card Deactivate) म्हणजेच बंद करण्यात येणार आहे. DoT चा नवीन नियम 7 डिसेंबर 2021 पासून देशात लागू झाला आहे.
सिम कार्ड 30 दिवसात बंद करण्याचा आदेश
दूरसंचार विभागने (DOT) सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सला (Telecom Operators) आदेश दिला आहे की, ज्या यूजर्सकडे 9 पेक्षा जास्त सिम कार्ड आहेत. त्यांना नोटिफिकेशन पाठवले जाईल. सर्व सिम कार्डची आउटगोइंग कॉल 30 दिवसात बंद केली जाईल. तर इनकमिंग कॉल 45 दिवसाच्या आत बंद करण्याचा आदेश दिला जाईल. मोबाइल सिम यूजर्सकडे एक्स्ट्रा सिम सरेंडर करण्याचा ऑप्शन सुद्धा आहे.
जर सब्सक्राइबर्सकडून नोटिफिकेशन नंतरही सिमला व्हेरिफाय (SIM card Verification) करण्यात आले नाही तर त्या सिमला 60 दिवसाच्या आत बंद करण्याचा आदेश दिला जाईल. जर सब्सक्राइबर इंटरनॅशनल रोमिंग, आजारी आणि अपंग व्यक्तींना 30 दिवसाचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. जर लॉ इन्फोर्समेंट एजन्सीकडून किंवा बँक किंवा अन्य वित्तीय संस्थेकडून मोबाइल नंबर विरोधात तक्रार मिळाल्यास सिमची आउटगोइंग कॉलला 5 दिवसाच्या आत बंद केले जाईल. सोबत इनकमिंग 10 दिवसासाठी बंद होईल. तर सिम पूर्ण 15 दिवसात बंद केले जाईल.
सिम कार्ड बंद करण्याचे आदेश
दूरसंचार विभागाने (Department Of Telecommunication) गेल्या बुधवारी 9 हून जास्त सिम ठेवणाऱ्या मोबाइल यूजर्सला लवकर व्हेरिफिकेशन (SIM card Verification) करण्याचे आदेश दिले आहेत. नियमांनुसार, एक यूजर जास्तीत जास्त 9 सिम कार्ड (Sim Card) खरेदी करू शकतो. परंतु, जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) आणि आसामसह (Aasam) पूर्वोत्तर राज्यासाठी जास्तीत जास्त 6 सिम कार्ड ठेवण्याचा अधिकार आहे.
या करिता घेतला निर्णय
दूरसंचार विभागाने (DOT) ऑनलाइन फ्रॉड (Online Froud), आपत्तीजनक कॉलसह वाईट घटना रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. फेक सिम कार्ड रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.