चेन्नई,दि.२५: पंजाबमधील मोहालीमध्ये ६० विद्यार्थीनींचा आंघोळ करताना व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. विद्यार्थीनींचे MMS व्हायरल झाले होते. एका विद्यार्थीनीनंच हे कृत्य केले होते. त्यानंतर सदर विद्यार्थिनीसह तिच्या मित्रांच्या मुसक्या आवळल्या होत्या. दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच आता तामिळनाडूमधील मदुराईमध्ये अशाच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे.
चेन्नईमध्ये एका प्रायव्हेट कॉलेजमधील विद्यार्थिनीला हॉस्टेलमधील तरुणींचे असेच फोटो आणि व्हिडीओ आपल्या मित्रांना पाठवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मदुराईच्या एका प्रायव्हेट कॉलेजमधील एक तरुणी इतर मुलींसोबत अण्णानगरमधील एका हॉस्टेलमध्ये राहते. या विद्यार्थिनीने इतर विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ गुपचूपपणे शूट करून पाठवल्याचा आरोप केला जात आहे.
या विद्यार्थिनीच्या हालचालींवर एका तरुणीला शंका आली. तिने याबाबतची माहिती हॉस्टेलच्या वॉर्डनला दिली. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेल्या हॉस्टेलच्या वॉर्डनने तरुणीचा फोन घेऊन चेक करण्यास सुरुवात केली, तेव्हा तिला धक्काच बसला. तिच्या फोनमध्ये तरुणींचे आक्षेपार्ह फोटो सापडले.
त्यानंतर वॉर्डनने याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, या तरुणीने हे व्हिडीओ आणि आक्षेपार्ह फोटो तिच्या मित्राला पाठवल्याचे समोर आले आहे. तिचा मित्र असलेला अशोक हा क्लीनिक चालवतो. अशोकचं तीन वर्षांपूर्वीच लग्न झालेलं आहे.
दरम्यान, तरुणीने आरोप केला की, अशोक हा तिच्यावर तरुणींचे आंघोळ करतानाचे आणि कपडे बदलतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड करून पाठवण्यासाठी दबाव आणायचा. पोलिसांनी आरोपी विद्यार्थिनीसह तिच्या मित्राला अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.