Job Alert: 10 वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांची इथे विविध पदांसाठी होणार भरती

0

Job Alert : 10 वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी आहे. आरोग्य केंद्रात या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र पुणे (Jawahar Gramin Arogya Kendra Pune) इथे लवकरच 10वी पास (10th passed jobs in Maharashtra) ते ग्रॅज्युएट उमेदवारांच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, वैद्यकीय पर्यवेक्षक, नर्स, वॉर्ड बॉय, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, हेड क्लर्क, जूनियर क्लर्क, ड्रायव्हर, शिपाई, वॉच मॅन, क्लिनर / हेल्पर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

फार्मासिस्ट (Pharmacist)

लॅब टेक्निशियन (Lab Technician)

वैद्यकीय पर्यवेक्षक (Medical Supervisor)

नर्स (Nurse)

वॉर्ड बॉय (Ward Boy)

आरोग्य सेवक (Arogya sevak)

आरोग्य सेविका (Arogya Sevika)

हेड क्लर्क (Head Clerk)

जूनियर क्लर्क (Jr Clerk)

ड्रायव्हर (Driver)

शिपाई (Peon)

वॉच मॅन (Watch Man)

क्लिनर / हेल्पर (Cleaner / Helper)

शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.

फार्मासिस्ट (Pharmacist) – उमेदवारांनी BAMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.

लॅब टेक्निशियन (Lab Technician) – उमेदवारानी CMLT किंवा DMLT पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

वैद्यकीय पर्यवेक्षक (Medical Supervisor) – उमेदवारानी GNM किंवा ANM पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

नर्स (Nurse) – उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.

वॉर्ड बॉय (Ward Boy) – उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.

आरोग्य सेवक (Arogya sevak) – उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.

आरोग्य सेविका (Arogya Sevika) – उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.

हेड क्लर्क (Head Clerk) – उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.

जूनियर क्लर्क (Jr Clerk) – उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव आवश्यक आहे.

ड्रायव्हर (Driver) – उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच RTO लायसन्स असणं आवश्यक आहे.

शिपाई (Peon) – उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वॉच मॅन (Watch Man) – उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

क्लिनर / हेल्पर (Cleaner / Helper) – उमेदवारांनी इयत्ता सातवी पास असणं आवश्यक आहे.

भरती शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 1000/- रुपये

मागासवर्गातील उमेदवारांसाठी – 500/- रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

म. ग्रा. आ. जि. व शिक्षण संस्था, शिकरापुर, ता. शिरूर, जि. पुणे- 412208

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here