Ravindra Mahajani Passed Away: प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन

0

पिंपरी,दि.15: Ravindra Mahajani Passed Away: चांगली कथा-पटकथा, रुबाबदार, देखणे रूप असे 1975 ते 1990 या काळात समीकरण आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिध्द अभिनेते रवींद्र ह. महाजनी (Ravindra Mahajani) (77) यांचे आकस्मित निधन झाले आहे. पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यानं मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. मराठीतील विनोद खन्ना अशी त्यांची ओळख होती.

रविंद्र महाजनी यांचे निधन | Ravindra Mahajani Passed Away

शुक्रवारी शेजाऱ्यांनी रविंद्र महाजनी राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती तळेगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, रविंद्र महाजनी राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी पोलिसांना रविंद्र महाजनी यांच्या मृतदेह आढळून आला. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस तपासात व्यक्त केला जात आहे.

रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचा मुलगा अभिनेता गश्मिर महाजनी (Gashmeer Mahajani) मुंबईत राहतो. पोलिसांनी त्याला सर्व माहिती दिली असून तो तात्काळ पुण्यात दाखल झाला. रविंद्र महाजनी यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांचा मुलगा गश्मिर महाजनीकडे सोपवण्यात येणार आहे. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती मिळत आहे.

गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून ते एकटेच इथं राहत होते. भाड्याने हा फ्लॅट त्यांनी घेतला होता. मात्र शुक्रवारी सायंकाळी अचानकपणे त्याच्या घरातून दुर्गंधीचा वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. पोलिसांनी घराचे दार तोडून प्रवेश केला तेंव्हा ते मृतावस्थेत आढळले. सर्व परिस्थिती पाहिली असता 2-3 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला.

मुंबईचा फौजदार

रवींद्र महाजनी यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 1975 मध्ये व्ही. शांताराम दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी (1978), दुनिया करी सलाम (1979), गोंधळात गोंधळ (1981), मुंबईचा फौजदार (1985) हे चित्रपट विशेष गाजले. रविंद्र महाजनी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केलं आहे. त्यांनी 1997 साली प्रदर्शित झालेल्या सत्तेसाठी काहीही या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. तसेच, या चित्रपटाची निर्मीतीही त्यांनीच केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here