अमरावती,दि.28: आमदार रवी राणा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचे वक्तव्य केले आहे. एप्रिल महिन्यात रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होईल, असं भाकित वर्तवलं होतं. अजित पवार यांनी बंड केले होते. मागच्या दीड वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन भूकंप झाले. पहिले एकनाथ शिंदे आणि मग अजित पवार यांनी उद्धव ठाकरे शरद पवारांना जोरदार धक्के दिले, त्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, असा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.
Ravi Rana On Politics: आमदार रवी राणा यांचे मोठे वक्तव्य
अजित पवार यांच्यानंतर शरद पवारही 15 ते 20 दिवसात मोदींच्या नेतृत्वाखालील सत्तेत सहभागी होतील, असा गौप्यस्फोट रवी राणा यांनी केला आहे. शरद पवारांनी केंद्रात आणि राज्यात मोदींना साथ द्यावी, यासाठी लालबागच्या राजाला साकडं घातल्याचंही राणा यांनी सांगितलं.
राजकारणात काहीही शक्य नाही आणि अशक्यही नाही, तसंच अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, असंही रवी राणा म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, नंतर उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते, ते मुख्यमंत्री झाले. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार थेट उपमुख्यमंत्री झाले, त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान रवी राणा यांनी केलं आहे.
याआधी एप्रिल महिन्यात रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप होईल, असं भाकित वर्तवलं होतं. यानंतर 2 जुलै रोजी अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाले होते. तसंच राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच रवी राणा शिवसेनेमध्ये भूकंप होईल, असा दावा करत होते.