सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरूणीवर अत्याचार

0

पुणे,दि.24: सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून एका तरुणीला शीतपेयामधून गुंगीचे औषध पाजून, तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मूळचा गुजरातमधील असलेल्या एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मितुल परमार (वय-25,रा. गुजरात) असे या तरुणाचे नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

परमार आणि तरुणीची सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख झाली होती. परमार याने संबंधित तुरूणीला जाळ्यात ओढून भेटण्यास बोलावले होते आणि नंतर तरुणीला शीतपेयातून गुंगीचे ओैषध दिले व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर सोशलमीडियावर व्हिडिओ सोशल करण्याची धमकी तिला दिली. यावर घाबरलेल्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक विजय पुराणिक तपास करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here