Ranjeetsingh Nimbalkar: भाजपा खासदाराचे राष्ट्रवादीबाबत सूचक विधान

0

मुंबई,दि.२६: भाजपा (BJP) खासदार रणजीतसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) यांनी राष्ट्रवादीबाबत (NCP) सूचक विधान केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. राज्यात सत्तांतर झाले. शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतानाच भाजपा खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी सूचक विधान केलं आहे. ते शनिवारी (२५ फेब्रुवारी) माध्यमांशी बोलत होते

काय म्हणाले रणजीतसिंह निंबाळकर? | Ranjeetsingh Nimbalkar

रणजीतसिंह निंबाळकर म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पाहणारे अनेक मुंगेरीलाल आहेत. स्वप्न पाहणं हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. स्वप्न पाहून शिवसेना संपली, अगदी तो पक्षही राहिला नाही आणि पक्षचिन्हही राहिलं नाही. त्याप्रमाणे भविष्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रमांक असेल.”

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच शिल्लक राहणार नाही

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मग मुख्यमंत्री काय आणि मंत्री काय. पक्ष शिल्लक ठेवणे ही त्यांची सध्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये हुरूप राहावा म्हणून ते असे वक्तव्य करत आहेत आणि बॅनरबाजी करत आहेत.”

दरम्यान, मागील महिन्याभरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आणि आता खासदार सुप्रिया सुळे यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर लागल्याचं समोर आलं. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी या बॅनरवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुंबईच्या बेलार्ड इस्टेट भागातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या बाहेर काही दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे “महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, एकच वादा, अजित दादा!” असा मोठा कटआऊट लागला होता. या बॅनरवरुन चर्चांना उधाण आल्यावर तात्काळ हा बॅनर तिथून हटविण्यात आला. त्यानंतर आता त्याच ठिकाणी “सुप्रिया सुळे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री” असा कटआऊट लावण्यात आला. पक्षात गदारोळ झाल्यानंतर सकाळी हा बॅनर प्रदेश कार्यालयाच्या बाहेरून हटविण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here