Ramesh Latke: शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0

दि.१२ः शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचं दुबईमध्ये आकस्मिक निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने लटके यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी लटके हे सहकुटुंब दुबईला गेले होते तेव्हाच हा प्रकार घडला. लटके यांचे कुटुंबीय अ‍ॅटॅक आला त्यावेळी शॉपिंगला गेले होते, असे राज्याचे मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

रमेश लटके (Ramesh Latke) हे दुबईला मित्राला भेटण्यासाठी गेले होते. बुधवारी रात्री अचानक त्यांना हार्ट अ‍ॅटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ते ५२ वर्षांचे होते. काँग्रेसचे सुरेश शेट्टी यांना हरवून २०१४ मध्ये पहिल्यांदा लटके हे आमदार बनले होते. २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार एम पटेल यांना पराभूत केले होते. ते मुंबई महापालिकेचे नगरसेवकही राहिले आहेत. 

सध्या त्यांचे पार्थिव दुबईवरुन मुंबईला आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी, “आम्ही सध्या पार्थिव देशात परत आणण्याचे प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती दिलीय.

लटके यांच्या निधनाच्या वृत्तामुळे त्यांच्या समर्थकांना आणि शिवसैनिकांना मोठा धक्का बसलाय. काही दिवसांपूर्वीच लटके हो त्यांच्या कुटुंबियांसोबत दुबईला गेले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here