Ramdas Athawale On Prakash Ambedkar: रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकर यांना मोठी ऑफर

0

शिर्डी,दि.29: Ramdas Athawale On Prakash Ambedkar: रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकर यांना मोठी ऑफर दिली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी येथे रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना भाजपाबरोबर येण्याची ऑफर दिली आहे. “प्रकाश आंबेडकर यांनी इकडं तिकडं फिरू नये. मी तुम्हाला भाजपाबरोबर घेऊन जातो,” असं रामदास आठवले म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांना ऑफर | Ramdas Athawale On Prakash Ambedkar

“32 राज्यात रिपब्लिकन पक्ष काम करत आहे. प्रत्येक राज्यात पक्ष वाढवण्याचं काम सुरू आहे. आपल्याला महाविकास आघाडीबरोबर संघर्ष करायचा आहे. रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या बाजूने असतो, त्यांनाच सत्ता मिळते. प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत. प्रकाश आंबेडकर सांगतात की वंचित आघाडी ज्यांच्याबरोबर असते, त्यांना सत्ता मिळते. वंचित आघाडी स्वत:च्या जीवावर निवडणूक लढते आणि पडतात,” असं रामदास आठवलेंनी म्हटलं.

तुम्हाला काहीही मिळणार नाही | Ramdas Athawale

“वंचित आघाडीच्या पाठिंब्याने कोणाची सत्ता आली नाही. माझ्या पक्षाच्या पाठिंब्याने काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेची सत्ता आली. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी इकडं तिकडं फिरू नये. मी तुम्हाला भाजपाबरोबर घेऊन जातो. आपण भाजपा आणि नरेंद्र मोदींबरोबर राहुया. उद्धव ठाकरेंबरोबर जाऊन तुम्हाला काहीही मिळणार नाही,” असं रामदास आठवलेंनी सांगितलं.

“उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागू नये. ते कसे आहेत, मला माहिती. त्यामुळे मी भाजपाबरोबर आलो आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे महायुतीत आले, तर स्वागतच आहे. तसेच, महिला, दलितांवरील अत्याचार थांबले पाहिजेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे,” अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here