मुंबईत बकरीवर लिहिले राम, 3 जणांविरूध्द गुन्हा दाखल

0

मुंबई,दि.17: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मटणाच्या दुकानात बकरीवर ‘राम’ हे नाव लिहून ती विक्रीसाठी ठेवली होती. मुंबईत धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक, येथील एका मटण दुकानाच्या मालकावर बकरीवर ‘राम’ लिहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे चित्र समोर आल्यानंतर हिंदू संघटनांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर आता पोलिसांनी कारवाई करत मटणाचे दुकान सील केले आहे.

मुंबईतील एका मटण दुकानाच्या मालकाने हिंदू देवतांचा अपमान केल्याची तक्रार मुंबईच्या सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात आली होती. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार हिंदू संघटना बजरंग दलाने केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी दुकानमालकांसह एका कर्मचाऱ्यासह 3 जणांवर गुन्हा दाखल केला. 

परवाना रद्द होणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दुकानात 22 बकरे कुर्बानीसाठी आणले होते, मात्र त्यातील एका बकऱ्यावर धार्मिक नाव लिहिले होते.’ तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींची ओळख पटवली असून मोहम्मद शफी शेख, साजिद शफी शेख आणि कुय्याम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी पोलिसांनी मनपा आणि इतर अधिकाऱ्यांकडेही हरकत घेतल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

भावना दुखावल्याचा आरोप

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर बकरीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. या शेळीच्या पाठीवर इंग्रजीत राम लिहिले होते. फोटो शेअर करताना हिंदू संघटनांकडून बकऱ्यावर हे लिहिणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. यामुळे त्यांच्या भावना दुखावल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता तीन आरोपींवर कारवाई केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here