Ram Gopal Varma: चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी The Kashmir Files चित्रपटावर व्हिडिओ रिव्ह्यू केला शेअर

0

दि.22: ram gopal varma on kashmir files: विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपट चर्चेत आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. प्रेक्षक आणि समीक्षक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) आपण चित्रपट पाहणार असल्याचे सांगितले आहे.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.फार मोठं बजेट नसतानाही चित्रपट भरपूर चालतोय. बॉलिवूड कलाकार आणि दिग्दर्शक चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याचा आग्रह करत आहेत. तर आता ज्येष्ठ चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी चित्रपट पाहिला. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ रिव्ह्यू शेअर केला आहे.

राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) म्हणाले की, ‘मी पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा रिव्ह्यू देत आहे, कारण चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना चित्रपटाचा ‘तिरस्कार’ वाटत होता. मी आतापर्यंत जे काही शिकलो होतो, या चित्रपटाने ते सर्व भ्रम नष्ट केले आहेत. या चित्रपटाने सर्व नियम मोडून काढले आहेत आणि आत्तापर्यंत ज्या गोष्टींना मी खरं मानत होतो त्याचा अर्थ बदलला आहे.’

राम गोपाल वर्मा म्हणाले

राम गोपाल वर्मा यांनी शेअर केलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’च्या रिव्ह्यू व्हिडिओत, सुरुवातीला ते म्हणतात, ‘माझ्या करियरमध्ये मी पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा रिव्हयू देत आहे. मी चित्रपटाच्या विषयाचा आढावा घेत नाही किंवा त्यात दाखवलेल्या वादग्रस्त मुद्यांबद्दल बोलत नाही. हा चित्रपट कसा बनला हे पाहण्यासाठी मी एक चित्रपट निर्माता म्हणून या चित्रपटाची समीक्षा करत आहे.’ राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाचे कथाकथन, चित्रपट बनवण्याची पद्धत आणि पात्रांची प्रशंसा केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी अनुपम खेर यांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

व्हिडिओ रिव्ह्यूमध्ये ते पुढे म्हणतात, ‘काश्मीर फाइल्सने पुस्तकात लिहिलेले सर्व नियम तोडले आहेत. त्यात एकही लोकप्रिय कलाकार नाही. प्रेक्षकांना आकर्षित करण्याची इच्छा दिग्दर्शकाने दाखवलेली नाही. आता जेव्हा जेव्हा एखादा दिग्दर्शक चित्रपट बनवण्याचा विचार करतो तेव्हा त्याला काश्मीर फाइल्सचा संदर्भ घेण्याशिवाय पर्याय नसेल. त्याला या चित्रपटाचा अभ्यास करावा लागेल.’

व्हिडिओच्या शेवटी राम गोपाल वर्मा म्हणतात, ‘मी काश्मीर फाइल्सचा तिरस्कार करतो कारण मी आतापर्यंत शिकलेल्या सर्व गोष्टी, माझे भ्रम तोडले आहेत. आजवर ज्या काही गोष्टी मी खऱ्या मानत होतो, त्या सगळ्या खोट्या असल्याचं या चित्रपटाने सांगितलं आहे. मी आता स्वतःला रोखू शकत नाही, मी पुन्हा सुरुवात करू शकत नाही, आता मी काहीही विचार करू शकत नाही. अरे, हे असं बनवायला हवं होतं. म्हणूनच मला काश्मीर फाइल्सचा तिरस्कार आहे, मग तो दिग्दर्शक म्हणून असो, अभिनयाची शैली असो किंवा पटकथा लिहिण्याची पद्धत असो.’

‘मेन स्ट्रीम बॉलिवूड, टॉलिवूड आणि इतरांच्या फेस व्हॅल्यूनुसार जाऊ नका की ते काश्मीर फाइल्सच्या मोठ्या यशाकडे दुर्लक्ष करत आहेत. प्रेक्षकापेक्षा ते जास्त हा चित्रपट गांभीर्याने घेत आहेत हेच खरं. ते गप्प आहेत कारण ते घाबरले आहेत.’ माझं पुनरावलोकन पहा. राम गोपाल वर्मा यांनी पुढे लिहिलं आहे की, ‘एकट्या विवेक अग्निहोत्रीने सर्व भ्रम मोडले आहेत. पहिलं, फक्त मोठे सुपरस्टारच प्रेक्षकांना सिनेमागृहात आणू शकतो. दुसरं म्हणजे, लोक फक्त मेगा-बजेट चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचले आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे कपिल शर्मा शोच्या माध्यमातून लोकांना थिएटरमध्ये आणता येते आणि चौथा भ्रम म्हणजे सुपरहिट गाण्यांनीच प्रेक्षक थिएटरपर्यंत पोहोचतात.’ असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here