Rakhi Sawant: अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

Rakhi Sawant: शर्लिन चोप्राबाबत आपत्तीजनक वक्तव्ये केल्याचा राखीवर आरोप

0

मुंबई,दि.19: Rakhi Sawant: अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईतील अंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे. शर्लिन चोप्राबाबत आपत्तीजनक वक्तव्ये केल्याचा राखीवर आरोप आहे. काही वेळेत अभिनेत्रीला अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे. (Rakhi Sawant Arrested)

काय आहे प्रकरण? | Rakhi Sawant

आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे. राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा (शर्लिन चोप्रा) आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. यानंतर मॉडेलच्या तक्रारीवरुन राखीवर आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिच्या तक्रारीवरुन नोव्हेंबर 2022 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत राखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करुनही ती हजर राहत नव्हती. त्यामुळे आज पोलीस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

हेही वाचा Viral Video: तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, चालत्या बसमध्ये चढली अशी

शर्लिन चोप्राने दाखल केली होती तक्रार | Rakhi Sawant News

समोर आलेल्या माहितीनुसार मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राने राखी विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आता राखीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शर्लिन चोप्राने स्वतः आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

शर्लिन चोप्राने ट्विट करत अंबोली पोलिसांनी राखीला अटक केल्याचं सांगितलं आहे. सोबतच शर्लिन चोप्राने आपल्या एफआरआयबाबत अतिरिक्त माहितीसुद्धा नमूद केली आहे. नुकतंच समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, राखी सावंतने शर्लिन चोप्राबाबत आपत्तीजनक वक्तव्ये केल्याने शर्लिन चोप्राने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ज्यासाठी तिला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? | Rakhi Sawant Arrested

‘बिग बॉस 16’ च्या सुरुवातीला अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्राने दिग्दर्शक साजिद खानला शोमध्ये सहभागी केल्याने नाराजी व्यक्त केली होती. साजिद खानने आपल्याला अश्लील प्रकारे वागणूक दिल्याचा गंभीर आरोप अभिनेत्रीने केला होता. तसेच साजिद खानने अनेक मुलींचं लैंगिक शोषण केल्याचासुद्धा आरोप शर्लिनने केला होता. त्यानुसार अशा व्यक्तीला बिग बॉससारख्या शोमध्ये राहण्याचा हक्क नसल्याचं तिचं म्हणणं होतं.

दरम्यान राखी सावंतने या प्रकरणात उडी घेत काही वक्तव्ये केली होती. राखी सावंत साजिद खानला भाऊ मानत असल्याने तिने शर्लिन चोप्राच्या या सर्व आरोपांना फेटाळून लावत हे सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. तसेच शर्लिनबाबत काही वक्तव्ये केली होती. हा सर्व प्रकार पाहून शर्लिन चोप्रा राखीवर भडकली होती. तसेच तिने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. राखी सावंतचा अटकपूर्व जामीन काल मुंबई सेशन कोर्टाने फेटाळून लावला होता. त्यानुसार अंबोली पोलिसांनी आज राखी सावंतला अटक केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here