मुंबई,दि.१३: Rajratna Ambedkar | बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे (BSI) अध्यक्ष राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar) यांनी मोठी घोषणा केली आहे शाईफेक करणाऱ्यास १ लाख रुपये रोख देणार असल्याची घोषणा राजरत्न आंबेडकर यांनी केली आहे. भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी फुले, आंबेडकर आणि कर्मवीर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी देणगी मागून म्हणजेच भीक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते.
कोण आहेत राजरत्न आंबेडकर? | Who is Rajratna Ambedkar?
राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाऊ – आनंदराव रामजी आंबेडकर यांचे पणतू आहेत. तर, मुकुंदराव आंबेडकर यांचे नातू आहेत. तसेच, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे (BSI) अध्यक्ष आहेत आणि या माध्यमातून ते बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांचे विचार भारतातील लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.

शाईफेक करणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस देणार: राजरत्न आंबेडकर
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या व्यक्तीवर ३०७ चा गुन्हाही दाखल करण्यात आला. तर, अनेकांनी शाईफेकीच्या घटनेचा विरोधही केला आहे. मात्र, राजरत्न आंबेडकर यांनी शाईफेक करणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाच केली.

प्रकाश आंबेडकर यांची चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका
चंद्रकांत पाटील यांच्या विधानांतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रकांत पाटलांवर खोचक शब्दांत टीका केली होती. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले किंवा भाऊराव पाटील असतील यांनी लोकांकडून पैसे घेऊन आपल्या संस्था उभ्या केल्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहे. मात्र, त्यांनी हेडगेवार किंवा गोळवलकरांचे नाव घेतलं नाही. याचा अर्थ हेडगेवार आणि गोळवलकरांनी त्यांच्या संस्था उभारण्यासाठी लोकांकडून पैसे घेतले नाहीत, तर आजच्या भाषेत खोक्यांच्या स्वरुपात पैसे घेतले आणि स्वत:च्या संस्था उभ्या केल्यात. ही कबुली चंद्रकांत पाटलांनी दिल्याचा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला होता. त्यानतंर, शाईफेकीच्या घटनेचं आता राजरत्न आंबेडकर यांनी समर्थन केलं आहे.