मुंबई,दि.१: Rajesh Tope On Lockdown: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Cases) वाढ होत आहे. अशातच ओमिक्रॉन (Omicron) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लागणार का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. (Rajesh Tope On Lockdown)
मुंबईतील काही भागांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट अगदी १० ते ११ टक्क्यांच्या आसपास जाऊन आला आहे. त्यामुळे राज्यभरात निर्बंधाची कठोर अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध वाढवलेही जाऊ शकतात. मात्र, सध्याच्या घडीला राज्य सरकार लॉकडाऊनचा कोणताही विचार करत नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांना घाबरून जाण्याची गरज नाही. लॉकडाऊनचा परिणाम हा अर्थकारणावर होतो, गरिबांना त्याचा फटका बसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबतच्या बैठकीवर याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यावेळी तुर्तास लॉकडाऊन लागणार नाही. पण निर्बंधाची तीव्रता आणखी वाढवली जाऊ शकते, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईतील कोरोना परिस्थिती गंभीर असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. राज्यात शनिवारी नव्या कोरोना रुग्णांचा १२ ते १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. मुंबईचा सरासरी कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हा पॉझिटिव्हिटी रेट १० ते ११ टक्क्यांवरही जाऊन आला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पट झाल्याचे टोपे यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पट झाल्याचे टोपे यांनी सांगितले. मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या भागांमध्ये बेड आणि ऑक्सिजनची उपलब्धता पाहून पुढील निर्णय घेतले जातील. राज्यात जेव्हा ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू लागेल तेव्हा आपोआपच लॉकडाऊन लागेल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.