Rajesh Tope: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे राज्यातल्या शाळाबाबत मोठं वक्तव्य

0

मुंबई,दि.१६: कोरोनाच्या (Corona) वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यातील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात अनेक जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत आहे. राज्यातल्या बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्याचे (Schools in Maharashtra will start soon) संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी आहे, तिथे अपडेट घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिले.

गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनची (Omicron) संख्या वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या नगण्य असताना शाळा बंद करणे, विद्यार्थ्यांचं अगोदरच मोठं शैक्षणिक नुकसान झालेलं असताना शाळेला टाळं लावणं योग्य नसल्याचं मत अनेक पालक व्यक्त करत आहेत. त्यानंतर आता राज्य सरकारने एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवली आहे.

कोरोनाच्या वाढणाऱ्या केसेस पाहून राज्यातल्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी रुग्ण नाहीत तिथे पन्नास टक्क्यांच्या क्षमतेने शाळा पुन्हा सुरु कराव्यात, अशी मागणी होत आहे. त्यामुळे पंधरा दिवसांनंतर आढावा घेऊन यावर पुनर्विचार करण्यात येईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील, असं टोपे यांनी म्हटलंय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here