सोलापूर,दि.19: माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) हे भाजपात प्रवेश करण्यात आला आहे. राजन पाटील यांची मोहोळ तालुक्यात मोठी ताकत आहे. राजन पाटील यांचे मोहोळ तालुक्यात वर्चस्व आहे. माेहाेळ तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील विरुध्द पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यातील वाद विकापाेला गेला आहे. येत्या दोन ऑगस्ट रोजी राजन पाटील आपल्या संपूर्ण गटासह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांना विधान परिषदेवर (MLA) घेण्याचा शब्द भाजपकडून देण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, राजन पाटील आणि कुटुंबीयांचा भाजप प्रवेश आता नक्कीच झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे बाळराजे पाटील यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्दही भाजपकडून दिल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीला गेली तीन पंचवार्षिक आमदार देणारे पाटील कुटुंबीय हे येत्या दोन ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे नक्की झाले आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी गेल्या साधारण पंधरा दिवसांपूर्वी समाज माध्यमावर पोस्ट करीत भाजप प्रवेशाचे संकेत दिले असल्याची चर्चा तालुक्यात चवीने चर्चेली गेली. त्याच पोस्टच्या पार्श्वभूमीवर माजी सभापती विजयराज डोंगरे यांनीही समाज माध्यमावर पोस्ट टाकून ‘इथे फक्त न्याय असतो, तसेच देशाच्या प्रगतीसाठी महत्त्व दिले जाते’ असे संकेत दिले होते. त्यामुळे या दोन्ही पोस्टची तालुक्यासह जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली होती.
माजी आमदार राजन पाटील यांच्यासारख्या एकनिष्ठ असणाऱ्या नेत्याची कोंडी झाली, या सर्व गोष्टी वरिष्ठांपर्यंत पोचल्या आहेत, परंतु त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. वरिष्ठांनी बघ्याची भूमिका घेणे म्हणजे अप्रत्यक्ष उमेश पाटील यांना बळ देण्याची भूमिका असल्याची चर्चा आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोहोळ तालुक्यात शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थिती लावली होती, पण हा विषय बाजूला पडला. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याबद्दल उघड नसला तरी राजन पाटील समर्थकांचा छुपा रोष आहेच.
भाजप प्रवेशाची अफवा असून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत कायम राहू, असे मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी एका न्युज पोर्टलशी बोलताना सांगितले.