Raj Thackeray: राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून केली राज्यपालांवर टीका

0

पुणे,दि.९: Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेनं (MNS) आज १६व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मनसेच्या वर्धापन दिनी पुण्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वर्धापनदिनाच्या मेळाव्यात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘तुम्हाला काय कळतं का? शिवाजी महाराज, रामदास स्वामी….आपला काय संबंध नसताना काहीही बोलून जायचं. शिवाजी महाराजांनी कधीही सांगितलं नाही की रामदास स्वामी माझे गुरू आहेत, ना रामदास स्वामींनी सांगितलं शिवाजी महाराज माझे शिष्य आहेत,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरे यांनीही आपल्या खास शैलीत राज्यपालांचा समााचार घेतला.

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :

तुमच्या पोटातली महाराष्ट्रासाठी काहीतरी करायची आग आयुष्यात कधी विझून देऊ नका. पुढचे अनेक टप्पे आपल्याला पार करायचे आहेत. पुढच्या काही दिवसांपासून माझा फेरफटका सुरू होईल. अजून अनेकांच्या घरी जायचं आहे. मी ठरवलेलंच आहे, जिथे जाईन, तिथल्या आपल्या पदाधिकाऱ्यांकडे जेवणार. पण इतर पक्षांसारखं जात बघून नाही जेवणार. मला जात समजत नाही, मी जात बघत नाही, मला जात कळत नाही, मी जात मानत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्हीही असेच असायला हवेत.

२१ मार्चला शिवजयंती आहे. आत्ता तारखेनं साजरी झाली, आता तिथीने आहे. आपली ओळखच मुळात त्यांच्यामुळे आहे. आम्ही मराठी आहोत असं जेव्हा आपण सांगतो, तेव्हा मराठी आहोत म्हणजे मराठी भाषा बोलणारे आहोत. हे मराठी लोक कुठे राहतात. शिवछत्रपती राजा होऊन गेला, त्याच्या भागात आम्ही राहातो. ज्याचा विचार मारण्यासाठी औरंगजेबालाही २७ वर्ष काढायला लागली, त्या शिवाजी राजाच्या भूमीत आम्ही राहातो. तारखेनं करावी की तिथीनं करावी? ३६५ दिवस करा. ज्याला जेव्हा वाटेल, तेव्हा करा. तिथीने का? कारण आपण सगळे सण तिथीने साजरे करतो, तारखेनं नाही.

माझ्या राजाचा जन्मदिवस म्हणजे माझा सण आहे. ती कुणाचीतरी फक्त जयंती नाही. तो महाराष्ट्राचा सण आहे. तो सण म्हणून साजरा करायचा आहे. २१ तारखेला सगळ्यांनी धूम धडाक्यानं शिवजयंती साजरी करावी.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here