मुंबई,दि.१७: Raj Thackeray On Meenatai Thackeray Statue: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फासण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाजी पार्क परिसरात तणाव निर्माण झाला आहे. अज्ञात व्यक्तीने मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला होता. त्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
घटनास्थळावर भेट देत राज ठाकरे यांनीही माहिती घेतली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी दादरच्या शीवतीर्थावरील माँसाहेबांच्या पुतळ्याची पाहणी केली आणि पोलिसांकडून माहिती जाणून घेतली.
राज ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच सीसीटीव्ही तपासून तात्काळ रिपोर्ट द्या असंही राज ठाकरे म्हणाले. २४ तासांच्या आत कळलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.








