Raj Thackeray: मराठा आरक्षण आंदोलन मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले…

0

मुंबई,दि.३०:Raj Thackeray On Maratha Andolan: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. राज ठाकरे यांनी एका वाक्यात उत्तर देत मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन सुरू केले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. 

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. हजारोंच्या संख्येने मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. मराठा आंदोलकांची गर्दी वाढत असून यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. (Raj Thackeray News)

Raj Thackeray On Maratha Andolan

या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता एका वाक्यात राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत मराठा आरक्षणावर एकनाथ शिंदे यांना धारेवर धरले आहे.  ठाणे येथील मनसे पदाधिकारी मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघाले होते, मात्र तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र आजपर्यंत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. 

काय म्हणाले राज ठाकरे? | Raj Thackeray On Maratha Andolan

“मराठा आरक्षणासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तर एकनाथ शिंदेंच देऊ शकतील. जरांगे परत का आले याचं उत्तर तेच देऊ शकतील” असं राज ठाकरे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास होतोय. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, “मागच्यावेळी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे येत असताना एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाऊन प्रश्न सोडवलेला ना, मग हे परत का आले?” असं राज ठाकरे म्हणाले.

मुंबईतील मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजही आरक्षणासाठी एकवटणार असल्याचं दिसून येत आहे. त्याकडे तुम्ही कसे पाहता यावर राज ठाकरे म्हणाले की, मला वाटते, या सगळ्या गोष्टींची उत्तरे तुम्हाला एकनाथ शिंदेंच देऊ शकतात. शिंदे जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा. सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. यावर एकनाथ शिंदेंच उत्तर देऊ शकतात. मुंबईकरांना जर त्रास होत असेल तर त्याचे उत्तर एकनाथ शिंदे देऊ शकतात. ते मागील वेळी नवी मुंबईत जाऊन प्रश्न सोडवून आले होते, मग ते मुंबईत का आले यावर शिंदेंच उत्तर देतील. या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही एकनाथ शिंदे यांना विचारा असं त्यांनी म्हटलं. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here