Raj Thackeray Interview: मनसे अध्यक्ष राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट तयार करणार

0

मुंबई,दि.16: Raj Thackeray Interview: मनसे अध्यक्ष राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट तयार करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर दोन ते तीन भागांत भव्य दिव्य सिनेमा घेऊन येतोय, त्यावर सध्या काम सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिली आहे. ‘गांधी चित्रपट पाहून मी भारावून गेलो. कॉलजेला असताना पहिल्यांदा माझ्या मनात असा विचार आला की, इतका भव्य चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांवर आला पाहिजे. यानंतर मी पुन्हा वाचन करण्यास सुरुवात केली.” ते मुंबईत ‘हर हर महादेव’ सिनेमाच्या निमित्तानं आयोजित प्रमोशनल कार्यक्रमात अभिनेता सुबोध भावेनं घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग घेऊन त्यावरच सिनेमा करणं म्हणजे त्या माणसावर अन्याय करण्यासारखं आहे असं मला वाटतं. मग माझ्या मनात आलं की टेलिव्हिजन सीरिअल करू, त्यासंदर्भात माझं आशुतोष गोवारीकर यांच्याशी बोलणं झालं. त्यावेळी तिथं नितीन चंद्रकांत देसाई तिथं होते. त्यांनी त्यात रस दाखवला आणि त्यांनी त्यावर काम सुरू केलं. ती सीरिअल येऊनही खूप वर्ष झाली. आता सर्व प्लॅटफॉर्म बदलले आहे. सध्या माझं त्यावर काम सुरू आहे. आताच मी तुम्हाला कुणाकडे काम दिलंय वगैरे या सगळ्या गोष्टी सांगत नाही. पण दोन ते तीन भागांत छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आणायचा माझा विचार सुरू आहे. आता त्याबद्दल सांगण्यासारखं काहीच नाही. ते झालं की सविस्तर बोलूच”, असं राज ठाकरे म्हणाले. 

शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, आता सर्व प्लॅटफॉर्म बदलेले आहेत. फिल्ममेकिंगही बदललं आहे. सर्व गोष्टी बदलेल्या आहेत. आता माझं यावर काम सुरू आहे. ते म्हणाले की, याबाबत मी जास्त आता सांगत नाही. मात्र मी याचं काम दिलं आहे. मात्र कोणाकडे दिलं आहे, हे त्यांनी सांगितलं नाही. तसेच याबाबत अधिकची माहिती त्यांनी दिली नाही. ते म्हणाले की, दोन ते तीन भागात मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट आणण्याचा माझा विचार सुरू आहे. आता मी याविषयी काही बोलत नाही. मात्र झालं तर यावर बोलूच, असं ते म्हणाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here