Rain Maharashtra: आज महाराष्ट्रातील या 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

0

मुंबई,दि.22: Rain Maharashtra: आज महाराष्ट्रातील या 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.आज मात्र शुक्रवारच्या तुलनेत राज्यात पाऊस काहीसा कमी असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रातील या 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा | Rain Maharashtra

तरीही पुण्यासह राज्यातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून इथे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबईतही आज मुसळधार पाऊस हजेरी लावेल असा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट आहे.

अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट असून मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आज ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे इथे हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here