दसरा सणापूर्वी प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार रक्कम
सोलापूर,दि.6:सोलापूर विभागांतील 9 हजार 500 कर्मचा-यांची बोनस मिळणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. यावर्षी कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस मिळणार आहे. सोलापूर विभागांतील जवळपास 9 हजार 500 कर्मचा-यांना 78 दिवसांचा बोनस मिळणार असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळेस वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक एव जनसंपर्क आधिकारी प्रदिप हिरडे आणि वरिष्ठ कार्मिक आधिकारी जी. पी. भगत उपस्थित होते.
प्रत्येकी 17 हजार 951 रुपये प्रत्येक कर्मचा-यांच्या खात्यावर ऑनलाईन जमा होणार आहेत. कोरोनाच्या कठीण काळात केवळ विशेष एक्सयप्रेस, श्रमिक स्पेशल आणि मालवाहतूक मोठया प्रमाणावर करण्यात आली. रेल्वे कर्मचा-यांनी कठीण काळात प्रवाशांना चांगली सेवा दिल्यामुळे बोनस जाहीर झाले आहे. त्याचबरोबर कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचा-यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्वावर रेल्वे मध्ये नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे यावेळी शैलेश गुप्ता यांनी सांगितले.