मुंबई,दि.17: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी डॅान अरूण गवळी यांचा उल्लेख करत मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात प्रचाराचा जोर वाढला आहे. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबल उडाली आहे. तर, भाजपामध्ये अवस्थता पसरली आहे. नार्वेकर यांचा प्रचारसभेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओत राहुल नार्वेकर मोठं वक्तव्य करताना दिसत आहेत. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांना संपूर्ण जग ओळखतं. अरुण गवळी यांचा अखिल भारतीय सेना नावाचा राजकीय पक्ष आणि संघटना आहे. अरूण गवळी डॅडी म्हणून सर्वपरिचित आहेत.
मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असल्याचे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे. राहुल नार्वेकर यानी भायखळा येथे भाषण करताना हे वक्तव्य केले. राहुल नार्वेकर यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफना व्हायरल झाला आहे.
उमेदवारी जाहीर होण्याआधीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईतून महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. नार्वेकर यांनी 14 एप्रिल रोजी भायखळ्यातील हेरीटेज हॉटेलमध्ये प्रचारसभा घेतली. या प्रचार सभेत राहुल नार्वेकर यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या भाषणात मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असल्याचे म्हणाले. मी विधानसभा अध्यक्ष आहे माझे मला अधिकार माहिती आहेत. अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. डॅडींप्रमाणेच अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडून प्रेम मिळेल. अखिल भारतीय सेनेच्या परिवारात एक सदस्य आलाय असं समजा या बहिणीला (गीता गवळी) भावाची साथ निव्व्वळ लोकसभेसाठी नाहीतर मुंबईची महापौर होईपर्यंत राहील असेही राहुल नार्वेकर म्हणाले.