Rahul Narwekar On MLA Disqualification Case: “अधिक चर्चा न करता योग्य कारवाई करणार” राहुल नार्वेकर

0

मुंबई,दि.२३: Rahul Narwekar On MLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिक चर्चा न करता योग्य कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपविल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता शिवसेनेच्या ४० व ठाकरे गटाच्या १४ आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा पाठविल्या. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी या नोटिसीला आपले उत्तर पाठवले असल्याची माहिती देण्यात आली आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला दिरंगाई होत असल्याबाबत ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. यातच सुनावणीला दिरंगाई होणार नाही. योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिले. 

शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याच्या कार्यवाहीला विलंब होत असल्याचा दावा ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेत विधानसभा अध्यक्षांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी मुदतवाढ दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या आमदारांनी नोटिसीला उत्तर दिले आहे. 

योग्य निर्णय घेतला जाईल | Rahul Narwekar On MLA Disqualification Case

आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घेत असतात तेव्हा ते ज्युडिशियल अधिकारी म्हणून काम करत असतात. याचं मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कारवाई आपण करणार आहोत. दरम्यान अपात्रतेबाबत सुनावणी करण्यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही. योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी म्हटले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here