Rahul Gandhi: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधीनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक

Rahul Gandhi: भाजप आणि काँग्रेसमध्ये किती वैर आहे, हे कुणापासूनच लपलेलं नाही

0

नवी दिल्ली,दि.3: Rahul Gandhi Praised Narendra Modi: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकतीच भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) पूर्ण केली. या यात्रेदरम्यान त्यांनी भाजपा (BJP) आणि PM मोदींवर हल्लाबोल केला. भाजप आणि काँग्रेसमध्ये किती वैर आहे, हे कुणापासूनच लपलेलं नाही. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर नेहमी टीका करताना दिसतात. राहुल यांनी क्वचितच पंतप्रधान मोदींचे कौतुक केले असेल. पण ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींनी पीएम मोदींच्या दोन योजनांचे कौतुक केले आहे.

काय म्हणाले राहुल गांधी? | Rahul Gandhi Praised Narendra Modi

केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधींना विचारण्यात आले की, जनतेला फायदा झाला, अशा मोदी सरकारच्या धोरणांबद्दल ते सांगू शकतात का?  यावर राहुल गांधी म्हणाले की, उज्ज्वला योजने अंतर्गत महिलांना मोफत सिलिंडर देणे आणि लोकांचे बँक खाते उघडणे, या दोन चांगल्या योजना आहेत. 

राहुल गांधींची मोदींवर टीका | Rahul Gandhi

यावेळी राहुल यांनी मोदींवर टीकाही केली. ते त्यांचे विचार भारतावर लादत आहेत. हे कोणीही मान्य करणार नाही. यावेळी राहुल गांधींनी दावा केला की, त्यांच्या आणि इतर अनेक विरोधी नेत्यांच्या फोनवर पेगासस स्पायवेअरद्वारे लक्ष ठेवले जात होते. गुप्तचर अधिकाऱ्यांनी फोनवर बोलताना बोलताना काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचेही राहुल म्हणाले. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर राहुल गांधींच्या व्याख्यानाचा व्हिडिओ जारी केला आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, आम्हाला (विरोधकांना) सतत दबाव जाणवत आहे. विरोधकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. माझ्याविरुद्ध काही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गेल्या वर्षी एका आंतरराष्ट्रीय मीडिया संस्थेने पेगासस स्पायवेअरचा वापर करुन 300 हून अधिक भारतीय मोबाइलवर पाळत ठेवल्याचा दावा केला होता. यानंतर काँग्रेस आणि इतर अनेक विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरुन संसदेत आणि संसदेबाहेर सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here