व्हायरल व्हिडीओवर राहुल गांधी यांनी दिले स्पष्टीकरण

0

मुंबई,दि.6: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण दिले आहे. भाजपाने राहुल गांधी यांचा व्हिडीओ शेअर करत टीका केली होती. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष खर्गे जी यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्यासोबत केली होती आणि इकडे राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यात एका कुत्र्याला बिस्किट देत आहेत. मात्र कुत्र्याने ते बिस्किट खाल्ले नाही, यानंतर त्यांनी तेच बिस्किट त्यांच्या एका कार्यकर्त्याला दिले.’

व्हायरल व्हिडीओबाबत राहुल गांधी यांना पत्रकार परिषदेत विचारल्यानंतर म्हणाले, “यामध्ये समस्या काय आहे? जेव्हा श्वानाला माझ्याकडे आणण्यात आलं तेव्हा तो घाबरलेला होता. तो भीतीने थरथरत होता. जेव्हा त्याने बिस्किट खाल्लं नाही तेव्हा मी त्या व्यक्तीकडे दिलं आणि म्हटलं तुम्हीच भरवा. नंतर कुत्र्याने ते बिस्किट खाल्लं. भाजपा लोकांची नेमकी अडचण काय आहे. कुत्र्याने त्यांचं काय बिघडवलं आहे?”.

या व्हायरल व्हिडिओवरून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, “केवळ राहुल गांधीच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने मला हे बिस्कीट खायला देण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही.” 

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही या घटनेवरून राहुल गांधींवर निशाणा साधला होता. त्यांनी राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here