Raghunath Kuchik: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्त्याचार केल्या प्रकरणी शिवसेनेच्या उपनेत्यावर गुन्हा दाखल

0

पुणे,दि.१७: लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरीक संबंध ठेऊन तिला गरोदर केले. तसेच जबरदस्तीने गर्भपात करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कामगार नेते आणि शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक Raghunath Kuchik (रा. येरवडा) यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी एका २४ वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मॉडेल कॉलनीतील प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल, गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल येथे ६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२० दरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक (Raghunath Kuchik) यांचे पीडित तरुणीसोबत प्रेम संबध होते. त्यांनी तरुणीला विवाहाचे अमिष दाखवले. या प्रेमसंबंधातून त्यांनी तरुणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. यातूनच फिर्यादी गरोदर राहिली. पीडित तरुणानी जेव्हा त्यांना आपण गरोदर असल्याची माहिती दिली तेव्हा त्यांनी तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पडले. इतकेच नव्हे गर्भपात न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास वाईट परिणाम भोगायला अशीही धमकी देण्यात आली. त्यानंतर फिर्यादी आजारी असताना त्यांच्याकडून जबरदस्तीने समजूतीचे करारनाम्यावर सह्या करुन घेतली असल्याची माहितीने तरुणी दिली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी आयपीसी ३७६, ३१३, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

मला आणि माझ्या कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी एक राजकीय षडयंत्र

दरम्यान, ‘मला आणि माझ्या कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी एक राजकीय षडयंत्र, हनी ट्रॅपसारखे प्रकरण तयार करुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी प्रतिक्रीया रघुनाथ कुचिक यांनी दिली. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून माझे कामगार क्षेत्रातील काम आणि माझी अनेक वर्षांची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे.माझा तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास असल्याचेही रघुनाथ कुचिक म्हणाले. ‘मला पूर्ण खात्री आहे, की तपास यंत्रणा या प्रकरणाचा संपूर्ण तपास करतील आणि मला न्याय मिळवू देतील. तसेच याबाबत आज खटला दाखल झाल्याने मी आज जास्त काही बोलणार नाही, मात्र माझी कायदेशीर टीम काम करत असून पुढील एक ते दोन दिवसांमध्ये याबाबत कागदपत्रांसह सविस्तर बाजू मांडणार’ असे कुचिक यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here