Radhakrishna Vikhe Patil: भाजपा नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठा दावा

0

अहमदनगर,दि.26: भाजपा नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामागे भारतीय जनता पार्टीचे पाठबळ असल्याची चर्चा सुरू होती. अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. विरोधी पक्षातील अनेक आमदार आणि नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा वारंवार भाजपकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देखील असाच दावा केला होता.

विरोधी पक्षातील आमदार आमच्या… | Politics

विरोधी पक्षातील आमदार आमच्या संपर्कात असल्यानं आम्हाला बहुमताची चिंता नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हटलं होतं. आता बावनकुळे यांच्यानंतर भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील असाच दावा केला आहे. जिल्ह्यातीलच नाही तर राज्यभरातील अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? | Radhakrishna Vikhe Patil

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक नेते सध्या भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असताना, केवळ अहमदनगर जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील अनेक मंडळी भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, कारण अन्य राजकीय पक्षांत त्यांना आता भविष्य उरलं नसल्याचं त्यांच्या लक्षात आल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

फडणवीस पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर प्रतिक्रिया

दरम्यान पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार यांची खेळी असू शकते असं जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं होतं. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर बोलणं टाळलं. जयंत पाटील नेमके कोणत्या संदर्भाने बोलले हे मला माहिती नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here