मगरीच्या तोंडात घातला हात, स्टंटबाजी पडली महागात

0

दि.11: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. अनेक व्हिडिओ हे मजेशीर असतात. प्रसिद्धीसाठी अनेकजण नको ते धाडस करतात. अनेकवेळा असे नको ते धाडस अंगलट येऊ शकते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या एक माणूस आणि मगरीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माणसाने केलेला आगाऊपणा त्याला चांगलाच भोवलाय. त्याने मगरीच्या तोंडामध्ये हात घालण्याचा प्रयत्न केलाय.

जीव धोक्यात घालून नको ती स्टंटबाजी करणे महागात पडू शकते. अशी स्टंटबाजी करू नये. सोशल मीडियावर व्हायरल होणार व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ अतिशय थरारक असून यात एक मगर दिसत आहे. स्वीमिंग पुलाच्या बाजूला ही मगर शांतपणे बसली आहे. मगरीजवळ एक माणूसदेखील बसलाय. तो मगरीच्या तोंडात हात घालून खेळ खेळतोय. एवढ्यावरच तो थांबलेला नाही. मगरीच्या तोंडात घातलेला हात तो आतबाहेर करत आहे.

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

माणसाच्या या कारनाम्यामुळे शेवटी मगर चांगलीच भडकली आहे. तीने आपल्या जबड्यात माणसाच्या हाताला पकडले आहे. आपला हात मगरीच्या तोंडात फसल्याचे समजताच माणूस चांगलाच घाबरला आहे. नंतर त्याने अथक प्रयत्न करून मगरीपासून स्वत:ची सुटका करुन घेतलीय. विशेष म्हणजे मगरीने हात अतिशय गच्चपणे पकडल्यामुळे माणूस चांगलाच जखमी झालाय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here