लस न घेतलेल्यांवर होणार दण्डात्मक कारवाई, राज्यातील या महापालिकेचा निर्णय

0

औरंगाबाद,दि.13: ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) रुग्ण आढळत असल्याने खळबळ माजली आहे. अशात लसीकरणावर जोर देण्यात येत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट (Omicron Variant) ओमिक्रॉनचा संसर्ग जास्त प्रमाणात वाढू नये म्हणून सरकार कडून सतर्कता बाळगली जात आहे. लसीकरणाच्या मोहीमेचा वेग वाढवण्यासाठी राज्य आणि जिल्हा पातळीवर प्रशासनाकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहे. त्यातच आता औरंगाबाद महानगरपालिकेने (Aurangabad Municipal Corporation) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या व्यक्तींनी कोरोनाचा एकही डोस घेतला नाही अशा लोकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तर 15 डिसेंबर पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाबाबत औरंगाबाद (Aurangabad) प्रशासन घेत असलेल्या कठोर निर्णयाची राज्यभरात चर्चा असून, ‘औरंगाबाद पॅटर्न’ आता इतर जिल्ह्यात सुद्धा राबवला जात आहे. त्यातच आता आणखी एका महत्त्वाच्या निर्णयामुळे लसीकरण मोहिमेला आणखी वेग येण्याची अपेक्षा प्रशासनाला आहे.

महानगरपालिकेने (Aurangabad Municipal Corporation) काढलेल्या पत्रकानुसार आता ज्या व्यक्तींनी लसीकरणाचा एकही डोस घेतलेला नाही किंवा एक डोस घेऊनही पुढील डोस घेण्याची तारीख होऊन गेल्यावरही दुसरा डोस घेतलेला नाही अशा व्यक्तींना 500 रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार. तर दंडामधील जमा झालेली 50 टक्के रक्कम ही पोलीस प्रशासन व 50 टक्के रक्कम मनपा फंडात जमा करण्यात येणार असल्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी घेतला आहे.

यापूर्वी लसीकरण न करणाऱ्या व्यक्तींना पेट्रोल, रेशन, शासकीय सुविधा, किराणा सामान यासह अनेक सुविधा घेता येणार नाही,असा आदेश औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढला होता. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी झपाट्याने वाढली होती. त्यातच आता महापालिकेने लसीकरण न करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश काढल्याने लसवंतांची संख्या वाढू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here