सोलापूर,दि.२४: Pune-Solapur Highway Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व चारचाकी गाडी यांची धडक होऊन भीषण अपघात (Pune-Solapur Highway Accident) झाला आहे. हा अपघात आज शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत एच. पी. गेट नंबर ३ च्या समोर झाला. चारचाकी गाडीने पाठीमागून मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून कारमध्ये चौघेजण अडकले आहेत. लोणी काळभोर पोलिसांसह ग्रामस्थ कटरच्या साहाय्याने जखमींना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा IPL Auction: आयपीएल 2023 च्या हंगामाकरीता मिनी लिलावात काव्या मारनने 2 खेळाडुंसाठी मोजले इतके कोटी
कारचा अपघात | Pune-Solapur Highway Accident
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत एच. पी. गेट नंबर ३ च्या समोर चारचाकी गाडीतून चौघेजण सोलापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी चारचाकी गाडीच्या पुढे असलेल्या मालवाहू ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने चारचाकी चालकाचे नियंत्रण सुटून गाडी ही थेट ट्रकच्या खाली घुसली.
हेही वाचा Video: हैदराबादमध्ये रस्ता खचला अन् अख्खा बाजार खड्ड्यात पडला
स्थानिक नागरिक व लोणी काळभोर पोलीस चारचाकी गाडीत अडकलेल्या चौघांना काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या अपघातानंतर पुणे -सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली असून अपघात झालेल्या ठिकाणी बघ्यांनी गर्दी केली आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे समजू शकली नाहीत.
दरम्यान, पुणे -सोलापूर महामार्गावर व सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात टँकर लावले जातात. याठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब ठरली आहे. त्यामुळे अपघातांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.