Pune accident: सोलापूर-पुणे महामार्गावर बस पलटली, 12 जण गंभीर जखमी

0

पुणे,दि.25: Pune accident: सोलापूर-पुणे महामार्गावर बस पलटली यात 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स बस काल रात्री पलटी झाली. यात 11 ते 12 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दौंड तालुक्यातील भांडगावजवळ हा अपघात झाला. बसमध्ये सुमारे 50 ते 60 जण प्रवास करत होते. ही बस मुंबईहून तेलंगणाला निघाली होती.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस उलटली. या अपघातात 11ते 12 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर यवत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढले आणि उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. (Pune Accident News)

राहुल गंगाधर तरटे (रा. नर्सीग रोड नांदेड), कु.नेहारिका नागनाथ हांडे, शंकुतला दिंगबर वाळके, कु.साक्षी नागनाथ हांडे (रा.देहु आळंदी पुणे), विग्नेश रमेश गकुला (रा.उमरगा जि. धाराधीव), पुष्पराज हनुमंतराव पाटील, ऐरना जठार गुमेरला (रा.चेंगल ता.विमगल जि.निजामबाद), सौ. माणिकेम मुतीराज जकाला, मुनीराज मुताबा जकाला (रा.तळोजा काॅम्पलेक्स नवी मुंबई), सौ. सुलोचना कृष्णा रेड्डी अशी जखमी झालेल्या प्रवाशांची नावं आहेत.

बस ढाब्यात जेवायला थांबली | Pune accident

पुण्याहून सोलापूरकडे जाणारी बस ढाब्यात जेवायला थांबली होती. जेवण केल्यानंतर प्रवासी बसमध्ये परतले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यावेळी गाडीचा ड्रायव्हर बदलला. दुसऱ्या ड्रायव्हरने बस चालवायला घेतली. त्यामुळे बस प्रचंड वेगात होती. यावेळी ड्रायव्हरचा बसवरुन ताबा सुटला आणि बस पलटली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here