केंद्रीय मंत्री किरन रिजिजू यांच्या डान्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक

0

दि.1 : गुरुवारी (30 सप्टेंबर) केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किरेन रिजिजू एक उत्तम डान्सर असल्याचे म्हटले आहे. अरुणाचल प्रदेशच्या चैतन्यशील संस्कृतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी काजलंग गावाच्या भेटीबद्दल सोलांग लोकांच्या ट्विटला टॅग केले आहे, जे अरुणाचल प्रदेशातील प्रत्येक समुदायाच्या मूळ लोकगीते आणि नृत्यांवर प्रकाश टाकते.

पंतप्रधानांनी ट्वीट केले की, ‘आमचे कायदे मंत्री किरेन रिजिजू देखील एक उत्तम डान्सर आहेत. अरुणाचल प्रदेशची चैतन्यशाली आणि गौरवशाली संस्कृती पाहून आनंद झाला. तत्पूर्वी, केंद्रीय कायदामंत्र्यांनी विवेकानंद केंद्र विद्यालयाच्या प्रकल्पांच्या देखरेखीसाठी बुधवारी रात्री काजलंग गावात त्यांच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला होता.

व्हिडिओमध्ये रिजिजू स्थानिक रहिवाशांसोबत नाचताना दिसले. व्हिडिओमध्ये, सोलंग लोक त्यांचे पारंपारिक लोकगीते गाऊन कायदामंत्र्यांचे स्वागत करत होते आणि गावातील काही रहिवासी आणि मंत्री पारंपरिक सूरांवर नाचत होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी लिहिले, ‘माझ्या भेटीदरम्यान जेव्हा आम्ही सुंदर काजलंग गावात विवेकानंद केंद्रीय विद्यालयाच्या प्रकल्पांच्या देखरेखीसाठी गेलो होतो. जेव्हा जेव्हा या लोकांच्या गावात पाहुणे येतात, तेव्हा हे सोलंग नृत्य या लोकांचे पारंपारिक मनोरंजन आहे. येथील मूळ लोकगीते आणि नृत्ये अरुणाचल प्रदेशातील प्रत्येक समाजाचे सार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here