पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली घोषणा, काँग्रसेच्या माजी पंतप्रधानाला भारतरत्न

0

मुंबई,दि.9: केंद्र सरकारने काँग्रेस नेते माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न (मरणोत्तर) देण्याची घोषणा केली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X वर पोस्ट करून ही माहिती दिली.

चौधरी चरणसिंग यांची आठवण करून, पीएम मोदींनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केले, ‘देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. आपल्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती त्यांनी केलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.’

आरएलडीचे प्रमुख जयंत सिंह यांचे आजोबा आणि शेतकऱ्यांचे मसिहा आणि माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. जयंत चौधरी यांनी पंतप्रधानांच्या घोषणेवर पोस्ट करत लिहिले, ‘मन जिंकले!’

काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘हे कळवताना आनंद होत आहे की आमचे माजी पंतप्रधान श्री पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून, नरसिंह राव यांनी विविध पदांवर असताना भारताची उत्कृष्ट सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे संसद व विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात आणि देशाच्या समृद्धी आणि विकासाचा भक्कम पाया रचण्यात त्यांचे दूरदर्शी नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here