मुंबई,दि.26:Vaccination In Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल देशाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आता देशात लसीकरण सुरू होईल. पुढील वर्षी 3 जानेवारीपासून ते सुरू होणार आहे. त्याच वेळी, खबरदारी म्हणून, सरकारने निर्णय घेतला आहे की लसीचा डोस आरोग्यसेवा आणि आघाडीवर असलेल्या कामगारांसाठी देखील सुरू केला जाईल. पुढील वर्षी 10 जानेवारीपासून ते सुरू होणार आहे. साठ वर्षांवरील सहव्याधीग्रस्त व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिसरा डोस देणार. त्याची सुरुवातही 10 जानेवारीपासून.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्वागत केले आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळातदेखील चर्चा झाली होती असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले की बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळातदेखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील 7 डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली होती. याशिवाय पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांनादेखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनादेखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यात योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येईल- टोपे
पंधरा ते अठरा वर्षाच्या वयोगटातील मुलांचे लसीकरण तसेच बूस्टर डोस साठी पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्वागत केलं आहे.19 नोव्हेंबरपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने आपण केंद्रीय आरोग्य मंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली होती. आज पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणेची खरी गरज होती. दरम्यान लसीकरणाचे राज्यात योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येईल. याशिवाय सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचं देखील टोपे म्हणाले.