राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाबाबत व्यक्त केला मोठा अंदाज 

0

सोलापूर,दि.16: अनेक राजकीय तज्ञ भाजपाला 200 जागाही जिंकता येणार नाहीत असे म्हणत असताना राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाबाबत मोठा अंदाज व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणूक 2024 साठी देशात चार टप्प्यात मतदान झाले आहे. तीन टप्प्यातील निवडणुका होणे बाकी आहे. देशभरात 380 जागांवर निवडणुका झाल्या आहेत. 

दरम्यान, राजकारणातील चाणक्य मानले जाणारे प्रशांत किशोर यांनी भाजपबाबत मोठा अंदाज व्यक्त केला आहे. प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीत ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशच्या संदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. उत्तर आणि पश्चिम भारतातील राज्यांतील निवडणूक निकालांचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. 

काय म्हणाले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर? 

Etv Bharat या न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार प्रशांत किशोर म्हणाले भाजपा पुन्हा सत्तेत येईल. पीके या नावाने प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप तिसऱ्यांदा सत्तेत परत येऊ शकते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पीके म्हणाले की, भाजपचे सध्याचे 300 जागांचे संख्याबळ कायम राहण्याची शक्यता आहे.

प्रशांत किशोर म्हणाले की, म्हणाले की, सध्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर आणि पश्चिम राज्यांमध्ये भाजपच्या जागांमध्ये मोठी घट झालेली नाही. यावेळी भाजपला 200 जागाही जिंकता येणार नाहीत, असे जे म्हणत आहेत, त्यांनी सांगावे- सध्याच्या 100 जागा भाजप कुठे गमावत आहे, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत म्हणाले. पीके म्हणाले, दक्षिण आणि पूर्वमध्ये भाजपची मतांची टक्केवारी आणि जागा वाढतील. सगळे एकत्र बघितले तर आज भाजपकडे 300 च्या आसपास जागा आहेत. मला यात फारसा बदल दिसत नाही.

लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीलाच पीके यांनी बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा दावा केला होतापश्चिम बंगालमध्ये भाजप नंबर 1 पक्ष बनू शकतो, असे ते म्हणाले होते. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले होते की, भाजपने गेल्या काही वर्षांत दक्षिण आणि पूर्व भारतात आपले अस्तित्व वाढवण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. यावेळी त्याचा फायदा पक्षाला मिळू शकतो. बंगालमध्ये भाजप नंबर-1 पक्ष म्हणून उदयास येईल, असे मला वाटते, असे प्रशांत किशोर म्हणाले होते.

तेलंगणा 

तेलंगणात काँग्रेस आणि भाजप यांच्यातील चुरशीच्या लढतीबाबत पीके म्हणाले की दोन्ही पक्ष प्रत्येकी अर्ध्या जागा जिंकू शकतात. ते म्हणाले की, दोन्ही पक्ष कमी-अधिक प्रमाणात दोन जागा जिंकू शकतात. पीके म्हणाले की, तेलंगणात भाजप आणि काँग्रेस 6-9 जागा जिंकू शकतात.

तेलंगणामध्ये लोकसभेच्या 17 जागा आहेत. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने सुमारे 20 टक्के मतांसह चार जागा जिंकल्या होत्या. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस नेत्यांमध्ये झालेल्या संघर्षाचा फायदा भाजप आणि काँग्रेसला होण्याची अपेक्षा आहे. 

बीआरएसने 2019 मध्ये लोकसभेच्या 17 पैकी 9 जागांवर सुमारे 42 टक्के मतांसह विजय मिळवला होता. नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत BRS ला पराभवाचा सामना करावा लागला आणि 119 पैकी फक्त 39 जागा जिंकता आल्या. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 64 जागा जिंकल्या आणि त्यांच्या मतांची टक्केवारी 10 टक्क्यांनी वाढून 39.40 टक्के झाली. 

अरविंद केजरीवाल यांच्यामुळे भाजपाला नुकसान?

गेल्या दोन वर्षांपासून बिहारच्या गावागावात फिरत असलेल्या प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुका 2024 बद्दल भाकित केले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले आणि लोकसभा निवडणुकीत प्रचार केला तर भारतीय जनता पक्षाचे कोणतेही नुकसान होणार नाही, असा विश्वास निवडणूक रणनीतीकार बनलेले नेते प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे. किशोर यांनी दावा केला आहे की, आप संयोजकांच्या बाहेर पडल्यामुळे त्यांच्या आघाडीसह काँग्रेसचेही नुकसान होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here