खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रश्नावर लोकसभेत उठवला आवाज

0

सोलापूर,दि.26: खासदार प्रणिती शिंदे यांनी महत्वाच्या प्रश्नावर लोकसभेत आवाज उठवला आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या लोकसभेमध्ये जनतेच्या विविध मुद्द्यांवरती सातत्याने आवाज उठवताना दिसून येत आहेत. शुक्रवारी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील आरोग्याच्या प्रश्नाला वाचा फोडली. सोलापूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये सोयीसुविधांचा अभाव आहेत. ईसीजी, सोनोग्राफी मशीन, इसीजी मशीन यासारख्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांना प्रश्न विचारला.

खासदार प्रणिती शिंदे या सोलापूर मतदारसंघातील समस्या सोडवाण्यासाठी आग्रही आणि आक्रमक भूमिका घेताना दिसून येत आहेत. शुक्रवारी त्यांनी संसदेच्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नांच्या काळामध्ये त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिळणाऱ्या सोयी सुविधामध्ये वाढ करण्याबाबतचा मुद्दा उपास्थित केला.

यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या की, देशात आणि महाराष्ट्रामध्ये अनेक सरकारी रुग्णालये आहेत. ज्यामध्ये सोयी सुविधाचा अभाव आहे. जे अद्यापही इनल्युकवेट आहे. या ठिकाणी सोनिग्राफी, इसीजी या सारख्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक लोकांना  शहरातील सिव्हील हॉस्पिटल येथे यावे लागते. साधे दिव्यांग दाखल्याकरीता देखील दिव्यांग ब्यक्तींना शहरातील सिव्हिल रुगनालायस भेट द्यावी लागते. दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी जे संकेतस्थळ आहे तेही मागील तीन महिन्यापासून बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

View this post on Instagram

A post shared by SolapurVarta (@solapur_varta)

साधा ईसीजी  काढण्याकरिता नागरीकांना सिव्हील हास्पिटल येथे यावे लागते. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून येणाऱ्या काळात. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत का? खासदार प्रणिती शिंदे यांनी आरोग्य मंत्री नड्डा या यांना विचारला.

यावर उत्तर देताना नड्डा यांनी आरोग्य सुविधा देण्याबाबत सरकार कटिबद्ध असून, नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा कशाप्रकारे मिळतील यासाठी प्रयत्न केले जातील असे उत्तर नड्डा यांनी दिले. तसेच नड्डा पुढे म्हणाले की, सरकारने जी व्यवस्था केली गेली आहे ती अशी आहे की प्राथमिक आरोग्य केंद्रामधून आपण 106 औषधे मोफत देत आहोत आणि 14 तपासणी मोफत करीत आहोत.

उपजिल्हा रुग्णालयमध्ये 172 औषधे मोफत दिली जातात आणि 63 विविध तपासणी मोफत केली जाते. कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये 300 औषधे मोफत देत आहोत आणि 97 विविध तपासणी मोफत केली जाते. याशिवाय जिल्हा रुग्णालयांमध्ये 381 औषधे मोफत देत आहोत आणि 134 विविध तपासणी मोफत केली जाते. सामान्य जनतेला हॉस्पिटलमध्ये विविध सोयी-सुविधा पुरविण्याचे आश्वासन यावेळी सरकार कडून देण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रांवरती अपंग प्रमाणपत्र यासारख्या सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here