Prakash Raj: प्रकाश राजने शिवछत्रपतींच्या भूमिकेतील अक्षय कुमारची उडवली खिल्ली

प्रकाश राजने (Prakash Raj) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अक्षयचे एक मीम शेअर केले आहे

0

मुंबई,दि.१२: प्रकाश राजने (Prakash Raj) शिवछत्रपतींच्या भूमिकेतील अक्षय कुमारची (Akshay Kumar) खिल्ली उडवली. Prakash Raj On Akshay Kumar महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी यांच्यावर आधारित चित्रपट बनवताना चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप होत आहे. वारंवार सांगूनही चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवणारा सिनेमा म्हटलं की राज्यातील सर्वच प्रेक्षकांच्या भावनेचा विषय असतो. त्यामुळे हा विषय हाताळणाऱ्या दिग्दर्शकांना सावधगिरीने सिनेमा बनवावा लागतो. दरम्यान गेल्या काही काळापासून शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित सिनेमा बनवणाऱ्या मेकर्सना प्रेक्षकांच्या संतापाचा सामना करावा लागला. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा सिनेमाही या यादीत आहे. या सिनेमातील मावळ्यांचा लूक, त्यांची नावं यावरुन मोठा वादंग उठला.

प्रेक्षकांना अक्षय कुमारची निवड रुचली नाही

‘वेडात मराठे वीर दौडले सात’वर टीका होण्याचे आणखी एक कारण म्हणजे या सिनेमात छत्रपती शिवरायांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार साकारतो आहे. प्रेक्षकांना अक्षयची निवड रुचली नसून त्यानंतर दिग्दर्शक आणि अक्षय यांना विशेष ट्रोल करण्यात आले. त्यातच काही दिवसांपूर्वी सिनेमातील अक्षयच्या लूकचा एक व्हिडिओ समोर आला आणि प्रेक्षकांचा संताप आणखी अनावर झाला. शिवछत्रपतींच्या चेहऱ्यावर जे तेज हवं ते अक्षयच्या चेहऱ्यावर नाही, त्यांच्या चालण्यात आत्मविश्वास नाही असं म्हणत प्रेक्षकांनी त्याला ट्रोल केलेलं.

Prakash Raj mocks Akshay Kumar in the role of ShivChhatrapati
View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या व्हिडिओमध्ये काय आहे?

या सिनेमातून छत्रपतींच्या इतिहासाचा विपर्यास केला जात असल्याचा आरोप होतच होता. त्यात समोर आलेल्या व्हिडिओतून इतिहासाची खिल्ली उडवली जात असल्याचा आरोप झाला. या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या झुंबरवर बल्ब असल्याने महाराजांच्या काळात बल्ब होते का? असा सवाल मेकर्सना विचारण्यात आला. यावर आता प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिने प्रकाश राज यांनीही अक्षयला ट्रोल केले. प्रकाश राजने (Prakash Raj) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अक्षयचे एक मीम शेअर करत या सिनेमाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘मन की बात’ असं कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट शेअर केलीये.

प्रकाश राज ट्रोल

दरम्यान प्रकाश राज यांच्या या ट्वीटचा उलटाच परिणाम पाहायला मिळाला. त्यांनी अक्षयला ट्रोल केल्याने अक्षयचे चाहते या दाक्षिणात्य अभिनेत्यावर भडकले आहेत. ‘कधीतरी डोक्याचा वापर करून लिहित जा’, असे त्यांना एका युजरने सुनावले. आणखी एका युजरने लिहिले की, ‘तुझे नाव प्रकाश राज नव्हे अंधकार राज असायला हवे.’ प्रकाश राज यांच्या ट्वीटवर एका युजरने लिहिले आहे की, ‘तुम्ही लोक बॉलिवूडला घालून पाडून का बोलताय? साउथ सिनेमे चांगले काम करत आहेत मान्य, पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही बॉलिवूडमधील केवळ चुकाच काढाल.’ आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘तुम्ही खऱ्या आयुष्यातही व्हिलन आहात’.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here