प्रकाश आंबेडकर यांचे उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठं वक्तव्य

0

नाशिक,दि.17: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. गेली काही दिवसांपासून सुरु असलेल्या शिवशक्ती भीमशक्ती (Shivshakti Bhimshakti) युतीवर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. शिवशक्ती भीमशक्तीला काँग्रेस राष्ट्रवादीचा (NCP) विरोध कायम असल्याचे दिसत असून आता उद्धव ठाकरेंनी ठरवायचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यामुळे शिव भीम शक्तीचा चेंडू उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे अद्यापही शिव भीम शक्तीवर शिक्कामोर्तब नसल्याचे आंबेडकरांच्या प्रतिक्रियेवरून दिऊन येत आहे.

धम्म मेळाव्यानिमित्त (Dhamm Melava) ॲड. प्रकाश आंबेडकर हे नाशिकमध्ये (Nashik) आले असून एबीपी माझाशी बोलताना त्यांनी अनेक मुद्दयांना हात घालताना शिव भीम शक्ती युतीच्या घोड अडलंय कुठं? या प्रश्नाचं उत्तर देखील त्यांनी यावेळी दिले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, महावीकास आघाडी बैठकीआधी उद्धव ठाकरे यांचा कॉल आला होता की वंचितचा मुद्दा निकाली काढतो म्हणून, मात्र त्यांच्या बैठकीत मुद्दा चर्चेला गेला की नाही माहीत नाही पण अजित पवारांनी प्रेसमध्ये सांगितलं की तो विषय चर्चाधीन आहे, याचा अर्थ त्यांचा विरोध कायम आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस मागच्या लोकसभा आणि विधानसभेत आम्हाला सोबत घ्यायला तयार नव्हते, आज त्यांचा स्टँड तोच असल्याचे आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीआधी उद्धव यांचा कॉल आला होता की वंचितचा मुद्दा निकाली काढतो म्हणून, मात्र बैठकीत मुद्दा चर्चेला गेला की नाही माहीत नाही पण अजित पवारांनी प्रेसमध्ये सांगितलं की तो विषय चर्चाधीन आहे. याचा अर्थ त्यांचा विरोध कायम आहे. त्यामुळे हा बॉल सेनेच्या कोर्टात आहे, की त्यांना आम्हाला घेऊन महाविकास आघाडीत जायचे आहे, शिवसेनेला ठरवायचे आहे की त्यांना आम्हाला सोबत घ्यायचे की महाविकास सोबत जायचे, असा सवाल यावेळी आंबेडकरांनी उपस्थित केला.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस श्रीमंत मराठ्यांचे ते प्रतिनिधी करतात, त्यांचा वंचित बहुजन आघाडीला सोशल विरोध आहे. उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट केले नाही तर आम्ही एकटे राहू पण भाजप सोबत जाणार नाही, वंचित बहुजन आघाडी ही पहिल्यापासून मनुवादी व्यवस्थेविरोधात काम करत आहे. त्यामुळे भाजपबरोबर युती शक्य नाही, मात्र शिवसेनबरोबर जाण्यास आम्ही तयार आहोत, मात्र सध्या महाविकास आघाडीचा निर्णय असून उद्धव ठाकरेंच्या गोटात हा निर्णय असल्याचे आंबेडकर म्हणाले.

आंबेडकर ठाकरे भेट

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेसोबत युती करण्यासाठी सशर्त तयारी दाखवली. प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या रिलॉन्चिंगच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका व्यासपीठावर एकत्र आले होते. आणि त्याआधीपासूनच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातल्या संभाव्य युतीची चर्चा सुरु झाली होती. अखेर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीची घोषणा केली. आगामी निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीसाठी होकार कळवण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीत विषय चर्चाधीन असल्याचे आज प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here