सोलापूर,दि.3: प्रकाश आंबेडकर यांचा सुशीलकुमार शिंदे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, “शिंदे यांनी निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये देशात आणि विदेशातील संपत्ती लपवली आहे तसेच त्यांच्यावरील गुन्ह्याचा उल्लेख त्यात नाही त्यामुळे या निवडणुकीनंतर त्यांची चौकशी सुरू होईल.”
शिंदे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही केसेसचा त्यात समावेश नाही. काही प्रॉपर्टीजचा समावेशही त्यात केला नाही. वास्ताविक पाहता निवडणूक आयोगाने त्याबाबत निर्णय घ्यायला हवा होता मात्र तो झाला नाही. असे प्रकाश आंबेडकर सोलापुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे या भाजपात गेल्याशिवाय राहणार नाहीत असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात माध्यमांशी बोलताना केला.