Prakash Ambedkar On Supreme Court: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान

0

मुंबई,दि.२०: Prakash Ambedkar On Supreme Court: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत मोठं विधान केलं आहे. मागील अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. राज्यात सध्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. पण शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती.

हेही वाचा देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, राज्य सरकार शेतकऱ्याला देणार एकरी 50 हजार

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला | Supreme Court

हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेलं असून यावरील सुनावणी संपली आहे. सुनावणी संपली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला आहे. कोणत्याही क्षणी हा निकाल लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील, अशी मतं घटनातज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहेत.

आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला | Prakash Ambedkar On Supreme Court

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत घडामोडी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला, तरी कुणाला अपात्र ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही. त्यावेळीचे जे उप सभापती यांच्या निर्णयाला न्यायालयाने जी स्थगिती दिली होती. ती स्थगिती कदाचित उठवली जाईल, अशी परिस्थिती आहे. हे प्रकरण राज्यपाल आणि कार्यकारिणी मंडळ यांच्यातील आहे. त्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here