Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा तर 200 पेक्षा जास्त जागा…

0

मुंबई,दि.31: Prakash Ambedkar On Maharashtra Politics: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठा दावा केला आहे. वंचित आणि शिवसेनेची (ठाकरे गट) युती (ShivSena-VBA Alliance) झाली आहे. बाळासाहेबांच्या जयंतीदिनी युती जाहीर करण्यात आली. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत या युतीचा फायदा होऊ शकतो.

वंचित महाविकास आघाडीचा भाग नाही…

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग नाही. वंचितला महाविकास आघाडीत सामील करण्यासाठी अजून थोडे दिवस थांबावे लागू शकते. काँग्रेसने वंचित महाविकास आघाडीचा भाग नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.

विधानसभेच्या 150 जागा येतील… | Prakash Ambedkar On Maharashtra Politics

आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत लढण्याबाबत सुचक विधान केलं आहे. ते म्हणाले की, “ठाकरे गट-वंचित आघाडी एकत्र लढल्यास विधानसभेच्या 150 जागा येतील असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी हे केलं आहे.

…तर 200 पेक्षा जास्त जागा येतील | Prakash Ambedkar

तर काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आल्यास 200 पेक्षा जास्त जागा येतील. एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सोबत बोलणार आहेत. तर पुढं म्हणाले आमची आणि ठाकरे गटाशी युती झाली आहे.पण अद्याप आम्ही महाविकास आघाडीचा भाग नाही, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील सभेत केला आहे. यावेळी आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा भाग होण्यासाठी सकारात्मकता दाखविली आहे. असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here