Praful Lodha: हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल 

0

मुंबई,दि.२१: Praful Lodha Jalgaon:  हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या नेत्याने २०२४ लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

प्रफुल लोढा यांच्यावर गंभीर आरोप | Praful Lodha Jalgaon

हनी ट्रॅपसह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा असलेल्या प्रफुल लोढा नावाच्या व्यक्तीला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. लोढा हा मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

हनी ट्रॅप प्रकरणानं महाराष्ट्राचं राजकारण चांगलेच चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत विरोधकांनी हनी ट्रॅप प्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर ना हनी, ना ट्रॅप असे कुठलेही प्रकरण नाही असे म्हणत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले होते. 

मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 62 वर्षीय प्रफुल्ल लोढावर नोकरीचे आमिष दाखवून एका 16 वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलींचे अश्लिल छायाचित्र काढून, मुलींना डांबून ठेवून त्यांना धमकावल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. 

पोस्कोसह बलात्कार, खंडणी आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जुलै रोजी प्रफुल्ल लोढाला अटकही करण्यात आली होती. या प्रकरणी एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

प्रफुल्ल लोढाच्या गुह्यांचा तपास करताना मुंबई पोलिसांनी जळगावच्या जामनेर आणि पहूर या ठिकाणी लोढा याच्या मालमत्तेची तपासणी केली. त्याचे लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक डिवाइस पोलिसांकडून जप्त करण्यात आले. दरम्यान, हा तपास त्याच्याकडे आणखी काही सीडी मिळतात का, हे शोधण्यासाठी होते. मात्र, त्याने ते कुठेतरी लपवून ठेवले असावेत, त्यामुळे पोलिसांना ते पुरावे हस्तगत करता आले नाहीत. एकेकाळी महाजन यांचा कट्टर विरोधक असणारा लोढा मधल्या काळात महाजनांचा विश्वासू बनल्याचा दावाही खडसे यांनी केला आहे. या आरोपामुळे खडसे व महाजन यांच्यातील वाद आणखी उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

प्रफुल्ल लोढाचे काही मातब्बर नेत्यांशी संबंध असल्याचे बोलले जात असून काही नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप प्रफुल्ल लोढाने केले आहे. त्यामुळे प्रफुल्ल लोढा हा कायम वादग्रस्त राहिला आहे. 

२०२४ ची लोकसभा निवडणुकीत एका पक्षाने त्यांना तिकिट दिले परंतु ५ दिवसातच ही उमेदवारी मागे घेण्यात आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. आता हेच हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. चर्चेतील हनी ट्रॅप संदर्भातील वेगवेगळे मुद्दे बाहेर येत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here