डॉन अरूण गवळीच्या भावाचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

0

मुंबई,दि.२६: प्रसिद्ध डॉन अरूण गवळीच्या (Arun Gawli) भावाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली. पहिला ठाकरे गट आणि दुसरा शिंदे गट. निवडणूक आयोगाने एक आठवड्यापूर्वी शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यानंतरही शिवसेनेतलं इनकमिंग वाढलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीचा भाऊ प्रदीप गवळी (Pradeep Gawli) आणि माजी नगरसेविका वंदना गवळी या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांचाही समावेश होता.

प्रदीप गवळी यांचा शिवसेनेत प्रवेश | Pradeep Gawli

मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकांना हवी असलेली या भागातले प्रश्न असतील त्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्याचं काम तुमच्या मार्गदर्शनाखाली तिथे केले जाईल हा विश्वास आपल्याला मी देऊ इच्छितो. गेल्या सहा-सात महिन्यामध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा सरकार आपण स्थापन केल्यानंतर या राज्यातल्या अगदी जिल्हा जिल्ह्यातून तालुका तालुक्यातून शहरातून अनेक लोक अनेक कार्यकर्ते विविध पक्षातले पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल होत आहे. एवढेच नाही तर राज्याच्या बाहेरचे देशभरातले देखील आपले कार्यकर्ते पदाधिकारी राज्य प्रमुख हे देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वांना प्रवेश दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here