मुंबई,दि.८: Sharad Pawar On Nagaland: नागालँडमध्ये (Nagaland) राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाप्रणित आघाडीला पाठिंबा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत कोहिमाममध्ये झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नागालँडमध्ये २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १२ जागांसाठी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ७ जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळाला.
नुकत्याच झालेल्या नागालँडच्या निकालात NDPP आणि भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. नागालँडमध्ये रामदास आठवलेंच्या आरपीआयने २ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागांवर विजय मिळवला. नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप सरकारला इतर छोट्या पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेत जाण्याचा आग्रह धरला. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवार यांनी भूमिका केली स्पष्ट | Sharad Pawar
नागालँडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत स्थानिक नेत्यांच्या मागणीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर बैठकीत नागालँड सरकारला पाठिंबा देणार असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका होत होती. त्यामुळे शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
नागालँडमध्ये भाजपला आमचा पाठिंबा नाही | Sharad Pawar On Nagaland
आमचा पाठिंबा भाजपला नसून नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, नागालँड राज्याच्या व्यापक हिताचा विचार करता त्याचसोबत राष्ट्रवादी आणि रिओ यांचे जुने संबंध पाहता या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नागालँडमध्ये सर्वपक्षीय सरकार स्थापन झाले असून एकही पक्ष विरोधात बसायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी सांगितले.
दरम्यान, नागालँडमध्ये भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने पाठिंबा दिला नाहीत तरी त्यांना सरकार बनवायला अडचण येणार नाही. नागालँडमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष आहे. नुकताच नागालँड सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. भाजप आणि एनडीपीपी यांनी सोबत सरकार स्थापन झाले आहे.