Sharad Pawar | भाजपाने राज्य पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांच्या भुमिकेचा विचार करावा: शरद पवार

Sharad Pawar: अनिल देशमुख एक वर्ष तुरुंगात होते

0

नाशिक,दि.11: Sharad Pawar On BJP: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपले मत मांडले. यावेळी ‘केंद्राच्या विसंगत राज्य सरकारचे प्रतिनिधी धोरण मांडत आहे. राज्य पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांच्या भुमिकेचा विचार भाजपने करावा’, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना विनाकारण तुरुंगात डांबलं | Sharad Pawar On BJP

अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना विनाकारण तुरुंगात डांबलं, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) एक वर्ष तुरुंगात होते. त्याचबरोबर संजय राऊत (Sanjay raut) देखील तुरूगांत होते. नवाब मलीक आजही जेलमध्ये आहेत, राज्य पातळीवर काम करणाऱ्या या नेत्यांना पाहता त्यांच्या भुमिकेचा विचार त्यांनी करावा, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

अजितदादांना मुख्यमंत्री करणार? | Sharad Pawar

राष्ट्रवादी आमदार निलेश लंके यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बोलून दाखवल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. पण ‘अजित दादा मुख्यमंत्री व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी ती आमच्याकडे संख्याबळ नाही, संख्याबळ असते तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता’ असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

मविआमध्ये कुठलाही वाद नाही

मविआमध्ये कुठलाही वाद नाही. नाना पटोलेंनी राजीनामा देऊन एक वर्ष झालं आहे. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. पटोलेंनी राजीनामा देतांना सगळ्यांना विश्वासात घेतलं नाही एवढीचं व्यथा आहे, पण आता तो विषय संपला आहे, असंही पवार म्हणाले.

मुंबई मनपाची निवडणूक पाहुन मोदी महाराष्ट्रात येत आहे हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही देत असतील तर काही हरकत नाही, पण ते येवून राजकीय भाषण करत असतील तर त्याचा विचार त्यांनीच करावा, असा टोलाही पवारांनी मोदींना लगावला.

राज्यात पत्रकारांवर हल्ला झाला. काँग्रेसच्या महिला आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरही हल्ला झाला. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडल्यावरुन ज्यांची जबाबदारी आहे ते याबाबत कितपत लक्षात घेता याबाब शंका आहे, असा अप्रत्यक्ष टोलाही पवारांनी फडवणीसांना लगावला.

‘केंद्राच्या सहकार परिषदेत भाजपचे आमदार आणि मंत्री अतुल सावेंचा मुद्दा उपस्थित करणार आहे, केंद्राच्या विसंगत राज्य सरकारचे प्रतिनिधी धोरण मांडत आहे, अशी नाराजी शरद पवारांनी व्यक्त केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here