रोहित पवार यांचा भाजपाचा उल्लेख करत गंभीर आरोप

0

बीड,दि.१९: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी भाजपाचा उल्लेख करत गंभीर आरोप केला आहे. राज्यात गेल्या काही दिवासांपासून मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. तर दुसरीकडे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी ओबीसी समाजाचा जालना येथे मेळावा झाला, या मेळाव्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नेतृत्व केले. त्यांनी यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह माजी मंत्री राजेश टोपे यांच्यावर आरोप केले, या आरोपांना आज आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

आज आमदार रोहित पवार बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. आमदार रोहित पवार म्हणाले, भुजबळ साहेबांचा अनुभव मोठा आहे. मोठी मोठी खाती त्यांनी बघितली आहे. पण त्यांनी ओबीसी खातं बघितलेलं नाही, ओबीसी खात्याला निधीची तरतूद कमी आहे. मोठ्या नेत्याने खालच्या पातळीत भाषण केलं, त्यांना भाजपने स्क्रिप्ट लिहून दिली असं वाटतं. भाजप जे बोलत ते तिथं बोलण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

‘पंकजा मुंडे म्हणाल्या भाजपच्या काही नेत्यांनी आम्हाला तिथे मेळाव्याला जाऊ नका म्हणून सांगितलं.काही नेत्यांनी सांगितलं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. त्यांनी जर पंकजा ताईंना जाऊन दिलं नसेल तर कदाचीत पंकजा ताईंचं लोकनेते पद आहे ते त्यांना पटत नाही. खडसे साहेबांचीही अशीच त्यांनी ताकद कमी केली, असंही आमदार पवार म्हणाले. लोकांच्या समोर भुजबळ साहेबांना पुढं करायचं आणि लोकांना ते पटलं नाहीतर भुजबळच विलन होणार भाजप सेफ राहणार हेच सध्या सुरू आहे. त्यांनी खरंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत योग्य निर्णय घ्यावा, असंही रोहित पवार म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here