मुंबई,दि.6: शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील (Khed) सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रामदास कदम, योगेश कदम, शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर आता रामदास कदम (Ramdas Kadam On Uddhav Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “उद्धवसाहेब तुम्ही एकदा नाही तर शंभर वेळा खेडमध्ये आलात तरी योगेश कदमला पाडू शकणार नाही. तुमच्या भोळ्या चेहरामागे अनेक चेहरे आहेत, ते चेहरे मी ओळखतो, याचा मी साक्षीदार आहे.” “मी केशवराव भोसलेंचा ड्रायव्हर होतो हे तुम्ही सिद्ध केलं तर मी तुमच्या घरी भांडी घासेन, अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल,” असं आव्हान देखील रामदास कदम यांनी दिलं.
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील खेड या ठिकाणी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर तुफान टीका केली. खेड हा रामदास कदम यांचा बालेकिल्ला आहे.
हे तुम्ही सिद्ध केलं तर मी तुमच्या घरी भांडी घासेन, अन्यथा… | Ramdas Kadam
केशवराव भोसलेचा ड्रायव्हर या वक्तव्यावरुन रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. मी केशवराव भोसलेंचा ड्रायव्हर होतो हे तुम्ही सिद्ध केलं तर मी तुमच्या घरी भांडी घासेन, अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल. मी वाघासारखा जगलोय, कोणाचा ड्रायव्हर म्हणून कधी नोकरी केलेली नाही. केशवराव भोसले यांच्या निवडणुकीच्या वेळी माझी गाडी,माझा पैसा, माझं डिझेल, काय संबंध कोणाचा ड्रायव्हर म्हणून काम करण्याचा? काल तुम्ही भाषणाची सुरुवातच अशी केली.
योगेशला, मला संपवण्याचे प्रचंड प्रयत्न
रामदास कदम म्हणाले की, माझा मुलगा योगेश कदमला तुम्ही संपवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. योगेश कदम यांना संपवण्यासाठी काय कारस्थान झालं ते 19 तारखेला उदय सामंत सांगणार आहेत. मला तर तुम्ही संपवणार होताच. मीडियासमोर जाण्याची मला बंदी घातली होती.” “2009 च्या निवडणुकीत मला पाडा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचा दावाही रामदास कदम यांनी केला.
मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही गद्दारी केली | Ramdas Kadam On Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना “तुमचे हात बरबटलेले आहेत. तुम्ही भ्रष्टाचारी आहात. तुम्ही अशोक पाटील यांचे तिकीट कापण्यासाठी किती पैसे घेतले? मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही गद्दारी केली. तुम्ही गद्दार आहात. तुमच्या भोळ्या चेहरामागे अनेक चेहरे आहेत, ते चेहरे मी ओळखतो, याचा मी साक्षीदार आहे.” अशी टीका केली.