Prakash Ambedkar On PM Modi: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीत बदलली” प्रकाश आंबेडकर

0

सोलापूर,दि.23: Prakash Ambedkar On PM Modi: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीचे रुपांतर ग्रामपंचायत निवडणुकीत केले अशी टीका केली आहे. प्रचारादरम्यान मोदींनी लक्ष्मण रेषा ओलांडली अशी टीकाही त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडले. महाराष्ट्रातील हा अखेरचा टप्पा होता आणि 4 जून रोजी निकाल लागणार आहे.

दैनिक जनसत्ताला प्रकाश आंबेडकर यांनी मुलाखत दिली. महाराष्ट्रातील सर्व 48 जागांवर निकराची स्पर्धा होती असे मला वाटते. एनडीएचा विजय असो किंवा महाविकास आघाडीचा विजय असो, विजयाचे अंतर खूपच कमी असेल पण गेल्या वेळी उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाल्यासारखे होणार नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले. 

लोकसभा निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीत… | Prakash Ambedkar On PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीत बदलली आहे. निवडणुकीचा प्रचार अतिशय क्रूर झाला. यादरम्यान वैयक्तिक हल्ले करण्यात आले आणि पंतप्रधानांनी ज्या प्रकारची भाषा वापरली ती अत्यंत वाईट होती. त्यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा अत्यंत खालच्या पातळीवर नेली. केंद्रीय यंत्रणा किती कमकुवत आहेत आणि त्या सत्ताधाऱ्यांचे हत्यार बनल्या आहेत, हेही या निवडणुकीत स्पष्ट झाले. 

प्रत्येक पंतप्रधान प्रचार करतात. यापूर्वी पंतप्रधान फक्त लोकसभा निवडणुकीत प्रचार करायचे आणि विधानसभा निवडणुकीत काही सभा घ्यायचे. पण मोदींनी जवळपास प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रचार केला आणि विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तेच केले. त्यांनी प्रत्येक निवडणुकीचे रूपांतर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये केले आहे. अशी टीका आंबेडकर यांनी केली. 

ते पुढे म्हणाले की, दलितांमध्ये भाजपविरोधात नाराजी असून त्यांनी एकजुटीने मतदान केले आहे. याचा प्रभाव महाराष्ट्र आणि देशातील अन्य राज्यातही दिसेल. दलित समाजाची लोकं पुन्हा भाजपचे समर्थन करताना दिसणार नाहीत. आरएसएस आणि हिंदुराष्ट्रासंबंधात त्यांच्या मनात संभ्रम कायम आहे. विकासाच्या मुद्द्यांवरही मोदींनी निराश केल्याचेही आंबेडकर म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here