आमदार नितेश राणे यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका

0

मुंबई,दि.10: भाजपा आमदार नितेश राणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावरून सातत्याने भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मराठा समाजाला कमी मुस्लिम समाजाला फायदा जास्त झाला आहे. त्यामुळे त्यांना आता मराठा समाजामध्ये आधुनिक मोहम्मद अली जिना आला नाही ना असा प्रश्न विचारला जातं आहे. अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. 

मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे एक तरी मराठा समाजातील तरुणाचा फायदा झाला असेल तर त्याचा हिशोब आम्हाला द्यावा. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजापेक्षा मुस्लिम समाजाचा फायदा अधिक झाला आहे. मनोज जरांगे म्हणजे आधुनिक मोहम्मद अली जिना तर नाही ना असा प्रश्न घराघरांमधून विचारला जातोय. ते जेव्हा गोधडीत होते. तेव्हा नारायण राणे यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे. आम्हाला आव्हान आव्हान देऊ नका. तुमच्या शाळेचे नारायण राणे हे प्राध्यापक आहेत, असा टोला नितेश राणे यांनी दिला आहे. 

शुक्रवारी सिंधुदुर्गामध्ये एका सभेला संबोधित करताना नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. नारायण राणे म्हणाले होते की, मनोज जरांगे पाटील सोलापूरमध्ये मला उत्तर देताना म्हणाले, राणेसाहेब मराठवाड्यात येताहेत तर येऊ दे. आमच्याकडे काय बघणार? आम्ही कपडे घालतो. अरे कपडे घातले तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच दिसतो. तुझ्यात बघण्यासारखं आहे काय? असा बोचरा सवाल नारायण राणे यांनी विचारला. आतापर्यंत मागच्या 400 वर्षांत बऱ्याच जणांनी दाढी वाढवली. ते छत्रपती झाले काय? नुसती दाढी वाढवून छत्रपती होता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.   


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here